Type Here to Get Search Results !

सई ताम्हणकर ठरली 2021 मधील 'टॉप 10 IMDB ब्रेकआऊट स्टार'

Actress Sai Tamhankar standing with sparkler in hand wearing simple kurta and imdb top 10 breakout stars announcment text written beside sai's image

चित्रपटांचा आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांचा इंटरनेटवरील आंतरराष्ट्रीय डेटाबेस आय.एम.डी.बी.ने(IMDb) या वर्षीची भारतीय सिनेमा आणि वेबसिरीज साठीची प्रेक्षकांच्या शोधातून उत्तम कामगिरी करणाऱ्या 10 कलाकारांची यादी जाहीर केली आहे.या यादीत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने(Sai Tamhankar) दहावे स्थान मिळविले असून याबाबत तिने सोशल अकाऊंटहुन माहिती दिली आहे.

आय.एम.डी.बी.वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्याप्रमाणे भारतीय सिने टेलिव्हिजन क्षेत्रातील चार हजार कलाकारांच्या यादीत जे त्यांच्या आयुष्यात 2021 मध्ये पहिल्यांदाच 'आय.एम.डी.प्रो स्टार मीटर' मध्ये जागा मिळवू शकले.त्यापैकी 10 कलाकार जे सतत वर्षभर चांगली रँकिंग मिळवत आलेले आहेत.त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.सईचा 2021 मध्ये प्रदर्शित झालेला आणि तिच्या भूमिकेचे कौतुक झालेला 'मिमी' हा चित्रपट तसेच 'नवरसा' आणि 'समांतर 2' या वेबसीरिजमधील तिच्या लक्षवेधी कामामुळे तिला 'टॉप 10 ब्रेकआऊट स्टार' यादीत येण्याचा सम्मान मिळाला आहे.


हेही वाचा,'जयभीम'चित्रपट ठरतोय IMDb रेटिंगने जगातभारी

सईने यावर आंनद व्यक्त केला असून तिने पोस्टमध्ये IMDb ला टॅग करत आभार मानले आहे.सईच्या यावर्षीच्या कामाची ही पोहोच पावती असून यापुढेही ती प्रेक्षकांचे मनोरंजन करतांना दिसेल.तिच्या आगामी सिनेमांमध्ये 'मिडीयम स्पायसी' या 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाचा समावेश आहे.

IMDb प्रत्येक वर्षी त्यांच्या वेबसाईटवर असलेल्या कलाकारांच्या प्रोफाइल पेज वर भेट देणाऱ्या वाचकांच्या संख्येहून ही यादी ठरवत असतात.ह्या यादीत येणाऱ्या कलाकारांची रँकिंग ठरवण्यासाठी IMDb वर महिन्याला दोनशे मिलियन पेक्षा जास्त व्हिजिटर / प्रेक्षकांची मदत होत असते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.