आज दोन बॉलीवूड सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या गेल्या.त्यात अमीर खानचा(Amir Khan) बहुप्रतिक्षित 'लाल सिंघ चड्डा'(Lal Singh Chaddah) आणि करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनचा नवीन चित्रपट 'जुग जुग जियो'ची (Jug Jugg Jeeyo) प्रदर्शन तारीख निश्चित करण्यात आली आहे.
'जुग जुग जियो' सिनेमाचे निर्माते आणि कलाकारांनी आज सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून फॅमिली ड्रामा असलेला हा सिनेमा 24 जून 2022 रोजी रिलीज करण्यात येणार आहे.
राज मेहता दिग्दर्शित 'जुग..' मध्ये वरून धवन(Varun Dhawan) कियारा अडवाणी (Kiara Advani)मुख्य भूमिकेत दिसणार असून वरिष्ठ कलाकार नीतू सिंग(Neetu Singh Kapoor) आणि अनिल कपूर( Anil Kapoor) हेही प्रमुख भूमिका साकारणार आहे.चित्रपटात लोकप्रिय ब्लॉगर यूट्युबर आर्टिस्ट प्राजक्ता कोळीचा(Prajakta Koli) देखील समावेश असून तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांना बरीच उत्सुकता आहे.
अमीर खान प्रोडक्शनचा बहुप्रतिक्षित 'लाल सिंघ चड्डा' सिनेमाची प्रदर्शन तारीख आज निर्मात्यांकडून पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली.या अगोदर कित्येक वेळेस बदलण्यात आलेल्या सिनेमाची नवीन रिलीज डेट 14 एप्रिल 2022 बैसाखी दिवस कळवण्यात आली आहे.
आमिर खान, करीना कपूर आणि दक्षिणेचा सुपर स्टार नागा चैत्यन्य यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'लाल सिंघ चड्डा' आमिरचा अतिशय महत्वकांक्षी चित्रपट आहे.आणि त्यासाठी आमिरने बरीच मेहनत घेतल्याचे समजते.सिनेमाचे चित्रीकरण केव्हाच पूर्ण झाले असून आता चित्रपट पोस्ट प्रोडक्शनमध्ये अटकला आहे.सिनेमात बरेच व्ही.एच.एफ. वापरले जात असून त्यासाठी अमीर वेळ घेत असल्याचे बोलले जात आहे.'लाल सिंग..' एका इंग्लिश कादंबरीवर आधारित हॉलिवूड चित्रपटाचे भारतीय रूपांतर आहे.यासाठी मराठी व हिन्दी सिनेमातील लोकप्रिय नट अतुल कुलकर्णी यांनी पुनलिखाण केले आहे.यासाठी त्यांना अनेक वर्षे लागले असल्याचे सांगितले जाते.मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अमीर खान या चित्रपटासाठी कुठलाही धोका घेऊ पाहात नसून त्यासाठी संपुर्ण सिनेमा त्याच्या पद्धतीने तो पूर्ण करून घेत आहे.दरम्यान, याच कारणाने सिनेमाच्या प्रदर्शन तारखी सारख्या प्रलंबित होत गेल्या.आता सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होत असल्याने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.