Type Here to Get Search Results !

शाहरुख खान'ला 'या' गाण्यात का घालावा लागला होता एकच शर्ट,जाणून घ्या

'डर' सिनेमातील 'तू मेरे सामने,में तेरे सामने 'गाण्यात SRK ला का घालावा लागला एकच शर्ट,जाणून घेऊ काय आहे यामागील भूमिका
Shahrukh and Juhi on a boat in tu mere samne song wearing colorful dresses
Tu mere samne song - Shahrukh Khan,Juhi Chala  stills (Courtesy-Yash Raj Films)

तीन दशके बॉलीवूडवर राज्य करणारा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan Birthday) आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने सिने इंडस्ट्रीतील मित्रमंडळींने तसेच जगभरात असणाऱ्या त्याच्या फॅन्सने शाहरुखवर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचा पाहायला मिळते आहे.तसेच आतापर्यंतच्या त्याच्या सिने करिअर मधल्या यशा अपयशाला देखील त्याच्या चाहत्यांकडून उजाळा मिळतो आहे.अशातच आपण शाहरुख खानच्या एका गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत,ज्यात शाहरुखला केवळ एकच शर्ट पूर्ण गाण्यामध्ये घातलेला आपण पाहिले होते.यामागे सिनेमा टीमची काय भूमिका असू शकते.चला तर जाणून घेऊया 

करिअरच्या सुरुवातीला शाहरुख खान डर, अंजाम, बाजीगर या सिनेमातून निगेटिव्ह रोल करतांना दिसला होता.या पैैकीच डर(Darr) सिनेमात त्याने साकारलेली एक तर्फी प्रेमात कुठल्याही थराला जाऊ शकणाऱ्या तरुणाचे पात्र विशेष गाजले होते.


Shahrukh Khan Song From Darr movie with juhi chawla

याच चित्रपटात 'तू मेरे सामने' हे अतिशय रोमँटिक गाणे शाहरुख आणि जुही चावला (Juhi Chawla) या दोघांवर चित्रित करण्यात आलते.यश राज फिल्म्सच्या आवडत्या आउट डोअर लोकेशनपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडमधील मनमोहक निसर्ग गाण्यात चित्रित करण्यात आला होता.परंतु या गाण्यातील सुंदर लोकेशन्स सोबतच अजून एका गोष्टीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.सहा मिनिटांच्या 'तू मेरे सामने' गाण्यात 'किरण' नावाची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री जुही चावलाने तब्बल 11 वेग वेगळे ड्रेस (costumes) परिधान केले आहे.मात्र शाहरुखला गाण्याच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकाच शर्टमध्ये दाखवण्यात आले.


Shahrukh Khan and Juhi Chawla romance in tu mere samne song

'डर' सिनेमात शाहरुखने साकारलेले पात्र एकतर्फी प्रेमीचे होते.त्यामुळे हे गाणे शाहरुखच्या ड्रीम सिक्वेन्समध्ये चित्रित झाले आहे.चित्रपटात या गाण्याची एकूण परिस्थिती बघता शाहरुख सिनेमातील त्याचे प्रेम असलेल्या 'किरण' बद्दल प्रेमाच्या कल्पनारम्य (फँटसी) दुनियेत जातांना दाखवलाय.त्याला 'किरण' कडून असणाऱ्या प्रेमातील अपेक्षांचा तो उघड्या डोळ्यांनी विचार करतो.पण तो वास्तवात राहतो.आणि त्या क्षणात गुंतून पडतो.किरणला तो त्याच्या स्वप्नाच्या दुनियेत पाठवतो मात्र स्वतः वास्तवात राहून तिला मिळवण्याचा विचार करत असतो.अशा प्रकारे अभिनेत्याने एकच शर्ट परिधान करून सिनेमातील डायजेटिक वास्तवासोबत एक सुसंगत स्वप्नवत जग सादर करण्यात हे गाणे यशस्वी झाले आहे.'डर' चित्रपटाने शाहरुख खानला प्रचंड लोकप्रिय बनवले.सिनेमाच्या यशात त्याचा सिंहाचा वाटा ठरला होता.गाण्यातील 'त्या' शर्टाला शाहरुख लकी समजत होता की काय ज्यामुळे त्याने तोच शर्ट पुन्हा त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बाजीगर' सिनेमातील शीर्षक गीतातही घातल्याचे पाहायला मिळाले होते.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला टिप्पणी करून कळवावे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.