Type Here to Get Search Results !

सारा अली खानची अतरंगी अदा 'छका छक' गाणे केले लाँच

बहूप्रतिक्षित 'अत रंगी रे'Atrangi Re सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.परंतु त्या अगोदर सिनेमाचे एक गाणे रिलीज करण्यात आले.सारा अली खान हिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या 'छका छक' गाण्यातील साराला(Sara Ali Khan) बघून तरुणाई मात्र चांगलीच थिरकतांना दिसतेय.


बॉलीवूडमधील मूवी मशीन अक्षय कुमार आणि दक्षिणेचा सुपर स्टार धनुष सारा सोबत 'अतरंगी रे' चित्रपटात एकत्र दिसणार आहे.वेगळ्या थाटणीतील प्रेमकथा असलेल्या या सिनेमाला प्रख्यात संगीतकार ए.आर.रेहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. याच चित्रपटातील एक गाणे आज टी-सिरीजच्या अधिकारीक युट्युब चॅनेलवर रिलीज करण्यात आले.गाण्यातील साराचे फ्लूरोसेन्ट रंगाची साडी आणि फ्लोरल ब्लाउजमधील लुक पाहून तिचे चाहते घायाळ झाले.साराचा डान्स आणि त्यातील मादक हावभाव ती आता सिने सृष्टीत चांगल्यापैकी रुळल्याचे आणि तिच्या अभिनयात परिपक्वता आल्याचे दर्शवित आहे.

इतर कॉ-स्टार शिवाय 'छका छक' गाणे लाँच करण्यासाठी आणि 'अतरंगी रे' चे प्रमोशन करण्यासाठी सारा आज एकटीच मुंबई येथील प्रसिद्ध असे 'मिठाबाई' कॉलेजमध्ये गेली होती.दरम्यान, साराने कॉलेजमधील तरुण - तरुणींसोबत गाण्यावर डान्स करत आणि सेल्फी काढत धमाल केली.

बिंधास्त मुलीची भूमिका साकारत असलेल्या सारा अली खानची सिनेमात महत्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे.चित्रपटाची रिलीज तारीख ठरली असून 'अतरंगी रे' 24 डिसेंबर 2021 रोजी ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.आता साराच्या गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळेल असे चित्रपट सृष्टीतील जाणकारांना वाटत आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.