Type Here to Get Search Results !

सलमान खानने( Salman Khan) केली फॅन्सनां 'ही' विनंती

सलमान खानचे मागील दोन वर्षात तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते.त्यापैकी 'भारत' आणि 'राधे' या चित्रपटांना प्रेक्षकांनी सपशेल नाकारले होते.'दबंग 3' सुद्धा मागील दोन चित्रपटांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर कुठलीही कमाल करू शकला नव्हता.त्यावर बऱ्याच प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडून सलमानची बॉक्स ऑफिसवरील क्रेज कमी झाल्याचे बोलल्या गेले.मात्र आता 'अंतिम'च्या(Antim- The Final Truth) तिकीट खिडकीवर चांगले यश मिळवू पाहत असतांना आणि चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने पुढच्या महिन्यात 56 वर्षाचा होणाऱ्या सलमानची जादू अजूनही कायम असल्याचे सिद्ध होत आहे.


Salman Khan in Antim movie sikh community getup

26 नोव्हेंबर शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'अंतिम' चित्रपट बऱ्यापैकी उद्योग करत आहे.सिनेमात आयुष शर्माची(Ayush Sharma) भूमिका पसंत केली जात आहे.सिनेमासाठी आयुषकडून घेतल्या गेलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत असतानाच सलमान खानच्या भूमिकेसाठीही त्याचे फॅन्स अतिउत्साही होतांना दिसत आहे.'अंतिम' रिलीज झाल्यानंतर सलमानचे चाहते भावूक होऊन अश्या काही गोष्टी करत आहे जे बघून सलमानलाच चाहत्यांना तसे न करण्याची विनंती करावी लागत आहे.झाले असे की दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथे एका अति उत्साही चाहत्यांने सिनेमागृहातच फटाखे फोडून अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला होता.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच माध्यमातून या गोष्टीवर रोष व्यक्त करण्यात आलता.स्वतः सलमाननेही चाहत्यांना असे काही न करण्याचे आव्हान केले होते.आजही सलमानने एक व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.संबंधित व्हिडिओमध्ये एका सिनेमा थेटरबाहेर सलमानच्या चाहत्यांकडून त्याचा कट आऊट पोश्टरला दुधाने अंघोळ घालण्यात येत आहे.त्यावर सलमान खान याने फॅन्सनां विनंती केली की "ज्या गरीब मुलांना दूध मिळत नाही,उपाशी राहावे लागते त्यांना हे दूध पुरवा."अशा प्रकारे या अभिनेत्याने दूध वाया न घालता गरिबांना द्यावे असे आव्हान केले आहे.

बॉलीवूडमध्ये या पूर्वी आवडत्या सुपरस्टारच्या सिनेमांना पाहण्यासाठी तिकीट घरावर लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळायचे.चाहते त्यांचे आपल्या आवडत्या अभिनेत्यावरील प्रेम अशा प्रकारे व्यक्त करायचे.पोस्टरला दुधाने अंघोळ घालणे इत्यादी गोष्टी या दक्षिण भारतातील सिनेमांच्या फॅन्सकडून केल्या जात असे.आता बॉलीवूडमध्येही अशा गोष्टी घडायला लागल्या असल्यामुळे फॅन्सने त्यांच्या सुपरस्टारच्या आव्हानाला प्रतिसाद दिला पाहिजे.ज्यामुळे कुणाच्याही जीविताला हानी होणार नाही.आणि प्रेक्षक सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनाचा आनंद घेऊ शकेल.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.