- 83 फिल्म कपिल देव यांच्या 1983 च्या विश्वचषक कामगिरीवर आधारित चित्रपट
- रणवीर सिंग दिसणार कपिल देव यांच्या भूमिकेत
- 83 film 24 डिसेंबर 2021 रोजी होणार रिलीज
- 3.50 सेकंदाच्या ट्रेलर झाले प्रदर्शित
1983 क्रिकेट वर्ल्डकपमधील बलाढ्य वे.इंडिज विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा झालेला विजय हा संपूर्ण भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस ठरला होता.त्या अभूतपूर्व विजयाच्या श्रेयाचे सगळेच मानकरी आणि त्यामागील मुख्य व्यक्ती म्हणजे त्यावेळचे भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या कार्याला '83' सिनेमाच्या माध्यमातून सम्मान दिला गेला आहे.
30 नोव्हेंबर रोजी सिनेमाचे तब्बल 3 मिनिटे 50 सेकंद लांबीचे दीर्घ ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले.अनेक पात्र तसेच घटनांच्या झलक दाखवत हे मल्टिस्टारर ट्रेलर सर्वसामान्य ट्रेलरपेक्षा थोडे जास्तच मोठे वाटते.ट्रेलरमध्ये कपिल देव यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता रणवीर सिंग मध्ये (Ranveer Singh) कपिल यांच्या शरीरयष्टी पासून ते बोलण्याची,चालण्याची,हावभावाची झलक दिसते.रणवीरने अगदी हुबेहूब कपिल यांची लकब आत्मसात केल्याचे पाहायला मिळते.सध्या ट्रेलरमध्ये तरी रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेला न्याय देतांना दिसतोय.कपिल यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका पदुकोण आहे.जी स्वतः सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक असून रोमी भाटिया यांच्या गेटअपमध्ये ती परफेक्ट दिसतेय.'83' चित्रपटात मेकअप आर्टिस्ट,सिनेमॅटोग्राफर यांची महत्वाची भूमिका असणार हे लक्षात येते.आणि त्यांनी संपुर्ण पात्रांच्या मेकअपसाठी आणि सिनेमॅटोग्राफर यांनी आपण टेलिव्हिजनवर लाइव्ह सामना जसा पाहतो तसे अँगल घेण्यासाठी खुप मेहनत घेतली असल्याचे ट्रेलरमधून जाणवते.'83' सिनेमाचे पार्श्वसंगीत देखील दमदार असून त्याचा प्रेक्षकांच्या भावना खिळवण्यास योग्यप्रकारे वापर केला आहे.
एकंदरीतच '83' मूवीच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या,रणवीरच्या फॅन्सच्या आणि कपिल देव यांच्या चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यासाठी जास्त वाट पाहण्याची गरज नसून '83' हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत रिलीज करण्यात येणार आहे.