Type Here to Get Search Results !

bigg boss marathi 3 - बी.बी.च्या घरात बदलली समीकरणे,मीरा बनली कॅप्टन

बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी कॅप्टन बनणे आणि पुढच्या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेपासून सुरक्षित असणे खूप महत्वाचे असते.त्यासाठी दोन दिवस कॅप्टन्सीसाठी बिग बॉसकडून देण्यात येणाऱ्या कार्याला उत्तमरित्या खेळणे आणि घरातील इतर स्पर्धकांचे मत मिळवणे गरजेचे असते.मात्र यासाठी घरातील पुरुष सदस्य खेळाला खूप हिंसक पद्धतीने पार पाडतांना दिसताय.त्याचीच शिक्षा म्हणून काही स्पर्धकांना 8 व्या आठवड्यासाठी झालेल्या कॅप्टन्सी कार्यादरम्यान अपात्र घोषित करून बिग बॉसने फक्त महिला सदस्यांना कॅप्टनसी उमेदवारी दिली.ज्यात मीरा जगन्नाथ बी.बी.च्या घरातील कॅप्टन बनली आहे.

Bigg Boss Marathi 3 contestants gayatri datar and meera jagannath lying on bed close-up image
Bigg Boss Marathi Captaincy Candidate for 8th week Meera,Gayatri

बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क दरम्यान उत्कर्ष,जय,विशाल,विकास,सोनाली आणि दादूस या 6 सदस्यांना चालू आठवड्यातील खेळातून बाद करण्यात आले होते.हे स्पर्धक कार्यादरम्यान इतरांना आणि स्वतःलाही इजा पोहचेल अशा पद्धतीने खेळ करतांना बिग बॉसला आढळले.त्यामुळे या सहा स्पर्धकांवितिरिक्त घरातील चालू आठवड्याची कॅप्टन असलेली स्नेहा,मीनल शाह,तृप्ती देसाई,निथा शेट्टी, मीरा आणि गायत्री दातार ह्या सहा महिला सदस्य कॅप्टन होण्यासाठी पात्र ठरल्या होत्या.त्यापैकी एकमेकांच्या सहमताने दोन सदस्यांची निवड कॅप्टन उमेदवारी साठी करावयाची होती.या पद्धतीने मीरा आणि गायत्री ह्या दोघी शेवटी राहून उमेदवार ठरल्या.पुढे त्या दोघींमध्ये 'दिवा कॅप्टन्सीचा' हे कार्य खेळावल्या गेले ज्यात मीरा जगन्नाथ हिने बाजी मारत घरात आठव्या आठवड्यातील कॅप्टन होण्याचा मान मिळविला.

बिग बॉस मराठी'च्या घरात बदलली समीकरणे

दरम्यान, पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात चांगले मित्र बनलेले जय दुधाने उत्कर्ष शिंदे गायत्री दातार आणि मीरा जगन्नाथ यांच्यात 'चुगली बूथ' मध्ये दाखवण्यात येणाऱ्या चुगलीमुळे दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय.मीरा आणि गायत्री ह्या दोघी 'टीम ए' च्या उत्कर्ष व जय यांच्या विरोधात खेळत असून ते दोघेही आता स्वतंत्र खेळतांना दिसताय.यापूर्वी हे चौघेही बिगबॉसने दिलेले प्रत्येक कार्य अत्यंत हुशारीने खेळून यशस्वी होतांना दिसत होते.पण इथून पुढे ह्या जोड्या एकमेकांच्या विरोधात किती दिवस खेळू शकतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.तिकडे 'टीम बी' मध्येसुद्धा मीनल शाहची उत्कर्ष आणि जयशी वाढती जवळीक सोनाली,विशाल विकास यांना टीममध्ये फूट पडत असल्याच्या भावना निर्माण करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.