Type Here to Get Search Results !

बिग बॉस मराठी होस्ट महेश मांजरेकर का?वाटताय प्रेक्षकांना पक्षपाती

mahesh manjrekar hosting bigg boss marathi show,mahesh sitting on the chair

बिग बॉस मराठी सीजन 3 सुरू होऊन दोन महिने उलटले आहे.रोमांचकारी झालेला खेळ आता शेवटच्या टप्प्यात आला असून स्पर्धकांना अंतिम पाच मध्ये येण्याचे वेध लागले आहे.प्रत्येक स्पर्धक आपला खेळ कसा चांगला दिसेल आणि प्रेक्षकांची मने कसे जिंकता येईल हा प्रयत्न करतांना दिसतोय.अशातच खेळाच्या सुत्रसंचालकाची स्पर्धकांप्रति भूमिका महत्त्वाची ठरते.परंतु बिग बॉस मराठीचे होस्ट असलेले महेश मांजरेकर हे स्पर्धकांमध्ये भेदभाव करत असल्याचे सोशल मीडियावर चर्चा होतांना दिसतेय.

बिग ब्रदर या अमेरिकन रियालिटी शोच्या फॉरमॅटवर तयार झालेल्या हिंदी भाषेतील बिग बॉस आणि त्यानंतर इतरही क्षेत्रीय भाषेत निर्माण झालेल्या या रियालिटी शो ला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.शो मधील बऱ्याचश्या सेलेब्रिटी स्पर्धकांचे चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचे असतात.तर काही स्पर्धकांना प्रेक्षक ओळखतही नसतात.हे स्पर्धक खऱ्या आयुष्यात कसे राहतात,कसे वागतात हे त्यांचा नैसर्गिक खेळातून पाहणे लोकांना आवडते.दरम्यान,वेगवेगळ्या प्रेक्षकांना वेगवेगळे स्पर्धक मानसिक स्तरावर कनेक्ट होत असतात.आणि त्या त्या स्पर्धकांचे हे प्रेक्षक फॅन्स होतात.जर अशात तुम्ही त्यांचा नैसर्गिक स्वभाव,खेळ दाबण्याचा प्रयत्न केला,तर काही चांगल्या स्पर्धकांचे खच्चीकरण होऊन त्यांचे प्रेक्षकांत वेगळेच चित्र तयार होऊ शकते.मांजरेकरही स्पर्धकांच्या नैसर्गिक खेळाला वाव न देता असेच काही करत असल्याचे बोलले जात आहे.बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी कसे वागावे याचे लिखित नियम अधिकारीकरित्या बिग बॉस कडून कुठेही दिल्या गेले नाहीत.जे काही नियम कॉन्ट्रॅक्ट सही करतांना स्पर्धकांसाठी असतात,ते सर्व हे स्पर्धक पाळतच असतात.त्यामुळे महेश मांजरेकर जे सल्ले काही सदस्यांना नियमित देतांना दिसतात,ते नेमकी बिग बॉसकडून दिले जातात की व्ययक्तिकरित्या मांजरेकरकडून हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे.असे प्रेक्षकांना वाटते आहे.

एखादया स्पर्धकांविषयीचे प्रेक्षकांचे सोशल मीडियावरील कॉमेंट्स मांजरेकर प्रमाण मानताना दिसताय.ते शो मध्ये याचा नेहमीच उल्लेख करत असतात.यामागे काही प्रांजाळ प्रेक्षक प्रश्न उपस्थित करतांना दिसताय.की काही स्पर्धकांचे फॅन - फॉलोअर्स जास्त किंवा कमी असू शकतात.काही प्रेक्षक जाणीवपूर्वक कुठल्यातरी मानसिकतेतून एखाद्याची बदनामी होईल असे कंमेंट्स करू शकतात.मग सोशल मीडियावरील एखादया स्पर्धकांविषयीचे मत कसे ग्राह्य धरू शकाल?.स्पर्धकांचे समर्थक आप्तेष्ट मंडळी पी. आर.बाहेर बसून एखाद्याला बदनाम करण्यासाठी किंवा चांगले दाखवण्याकरिता जाणून बुजून सोशल मीडियावर मोहीम चालवू शकतात.त्यावेळेस कोण प्रांजळ प्रेक्षक आहे आणि कोण मोहिमेचा भाग हे ओळखण्यासाठी मार्ग उरत नाही.मग सोशल मीडियावरील कॉमेंटवर हा खेळ आधारित आहे का?बिग बॉसचे स्वतः चे कुठले निकष नाही का? हे आणि असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात घर करत आहे.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिजनमधील स्पर्धक जय दुधाने,उत्कर्ष शिंदे,मीरा जगन्नाथ यांना पहिल्या आठवड्यापासून होस्ट महेश मांजरेकर यांच्याकडून काही व्ययक्तिक सल्ले दिल्या जात आहेत.तसेच यांच्या आपापसात असलेल्या खेळाची 'स्ट्रॅटेजी' उघड करून त्यांचा ग्रुप फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.या उलट घरातील इतर काही सदस्यांच्याप्रति त्यांच्या ओढा असून त्या स्पर्धकांच्या चुकांना पोटात घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न मांजरेकर यांच्याकडून होत असल्याचा काही प्रेक्षक आक्षेप नोंदवत आहे.पहिल्या आठवड्यात घरात कॅप्टन झालेल्या उत्कर्ष शिंदे याने कशाप्रकारे चूक खेळले हे मांजरेकर यांनी दाखवून देण्याच्या प्रयत्नानंतर उत्कर्ष यांचे बंधू लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांनी देखील होस्ट मांजरेकरांचा बिग बॉसमधील 'चावडी' हया शनिवार रविवारी येणाऱ्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले होते.

खेळात ताकतीचा उपयोग न करता,कुणालाही इजा न होता दिलेले कार्य पूर्ण झाले पाहिजे.हे महेश यांना शोच्या होस्ट या नात्याने वाटते.हे योग्य आहे.आणि ते प्रेक्षकांना सुद्धा मान्य असते.पण जर जयचे टीमची बाजू घेऊन दुसऱ्यावर ओरडणेही बंद झाले,स्नेहाचे सकाळी 'सारंगे बिग बॉस' म्हणणे बंद झाले,उत्कर्षचा 'गेम प्लान' ज्याला माचीस ची काडी म्हंटल्या गेले तेही बंद झाले तर खेळ निरस वाटू शकणार नाही का? कदाचित बऱ्याच प्रेक्षकांना यांचे असे वागणे बोलणे आवडत असेल.फक्त ते प्रेक्षक सोशल मीडियावर या विषयी कंमेंट्स करत नाही.किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नसू शकेल.त्यामुळे आपल्याला काय पहायचे आहे हे महत्त्वाचे नसून प्रेक्षकांना जे आवडत आहे त्यामध्ये बाधा न आणता,प्रेक्षकांवरच सोडावे कुणाचा खेळ आवडल्यामुळे त्यांनी त्या स्पर्धकांना आत ठेवायचे आणि एखाद्याच्या न आवडलेल्या खेळामुळे त्याला बाहेर पाठवायचे.स्पर्धकांना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळू दिल्यास प्रेक्षकांच्या नजरेत नायक ठरण्यास किंवा खलनायक ठरण्यास स्पर्धक स्वतः जबाबदार असतात.

महेश यांच्या सूत्रसंचालयाविषयी पहिल्या आणि दुसऱ्या सिजनमध्येही प्रश्न उपस्थित झाले होते.मात्र त्यांचा प्रयत्न बिग बॉसच्या घरात शांतपणे खेळ झाला पाहिजे आणि लोकांना स्पर्धकांचे चांगले गुण दिसले पाहिजे असा असू शकतो.त्यांची भूमिका होस्ट म्हणून प्रांजळ असू शकते.पण यामुळेच काही प्रेक्षकांना बाहेर महेश पक्षपाती दिसू शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.