रविवारच्या भागात स्पर्धक स्नेहा वाघ एलिमिनेट झाल्यानंतर आता बिग बॉसच्या घरात नऊ सदस्य उरले आहे.प्रत्येक स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्यात लागलेला असतांना बिग बॉसकडून देण्यात येणारे साप्ताहिक कार्य देखील अवघड होतं चालले आहे.10 व्या आठवड्यात 'मुंबई' ह्या थीम वरून स्पर्धकांना कार्य देण्यात आले.उत्कर्ष हा टेम्पटेशन स्वीकारून नॉमिनेशन पासून पहिलेच सुरक्षित झाला होता.गायत्री देखील या आठवड्यात कॅप्टन असल्यामुळे या प्रक्रियेपासून दूर होती.
बिग बॉस मराठी सीजन 3 चा खेळ आता दहाव्या आठवड्यात पोहोचला असून प्रत्येक सप्ताह स्पर्धकांसाठी नवीन नवीन आव्हाने घेऊन येत आहे.'मुंबई' शहराच्या थीमवर आधारित नॉमिनेशन टास्क या आठवड्यात खेळावल्या गेला.गायत्री कॅप्टन असल्यामुळे ती संचालकाच्या भूमिकेत दिसली.तसेच मीरा अगोदरच नॉमीनेट असल्याकारणाने ती इतर स्पर्धकांना नॉमीनेट करण्याचा प्रक्रियेत सहभागी होती.
कार्याअंती उवरीत सदस्यांपैकी मीनल शाह,सोनाली पाटील,विकास पाटील,मीरा जगन्नाथ आणि संतोष चौधरी उर्फ दादूस हे स्पर्धक 10 व्या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमीनेट झाले आहे.या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कसाठी मंगळवारपासून घरात मासोळी बाजार भरूवून एक एक टीम विक्रेता आणि ग्राहक या स्वरूपात दिसणार आहे.कार्याअंती जास्तीत जास्त ग्राहक मिळवून उरलेले दोन स्पर्धक घरातील कॅप्टनपदासाठी बिग बॉसकडून दिलेले टास्क पूर्ण करतील आणि त्यात विजेता झालेला सदस्य कॅप्टन बनण्यास पात्र ठरेल.