Type Here to Get Search Results !

Shiddat Movie 'शिद्दत' चित्रपट पाहिल्यावर काय म्हणाले प्रेक्षक,पहा tweets

Shiddat Movie actor Radhika Madan and Sunny Kaushal in the image

सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरू असलेला नवीन चित्रपट 'शिद्दत'(Shiddat ) १ ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला.'शिद्दत' मध्ये,राधिका मदन (Radhika Madan),सनी कौशल (Sunny Kaushal),मोहित रैना (Mohit Raina),डायना पॅंटी (Diana Penty) यांची समांतर दाखवण्यात आलेली लव स्टोरी पाहायला मिळते.'रोमॅंटिक ड्रामा' असलेला 'शिद्दत' वास्तववादी प्रेम कथेपासून खूप दूर असून एक नेहमीचा 'टिपिकल फिल्मी प्रेम कथा'असलेला सिनेमा आहे.कलाकारांच्या अभिनयामुळे आणि बऱ्याच कालांतराने आलेल्या थोडया हटके फिल्मी लव स्टोरीमुळे,  तरुण प्रेक्षकांना हा सिनेमा आवडतांना दिसतोय.दरम्यान,चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची आणि दिग्दर्शक कुणाल देशमुख (Kunal Deshmukh) यांची समीक्षकांकडून स्तुती होत आहे.पण कथानकाच्या मांडणी विषयी एकंदरीत संमिश्र मते व्यक्त होतांना दिसता आहेत.

१ ऑक्टोबर रोजी 'शिद्दत' डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला असून सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.शिद्दत सिनेमातील गाणे आणि पार्श्वसंगीत देखील शिद्दतसाठी जमेची बाजू ठरत आहे. विशेषतः शीर्षक गीत लोकांना आवडतांना दिसतेय.मेल - फिमेल व्हर्जनमधील टायटल गीत अगोदरच रिलीज झाले होते.फिमेल ऑफिशियल व्हर्जन श्रीलंकेच्या 'मानिके मागे हिते' फेम योहानी डिसिल्वा Yohani De silva हिने गायले असून चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या गाण्याचा चांगला उपयोग निर्मात्यांकडून करण्यात आला.

सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत असून जुन्याच कथेला नवीन झालर देऊन चित्रपट बनविण्यात आल्याचे त्यांना वाटते आहे.सिनेमा दिग्दर्शकाकडून व्यवस्थित हाताळल्या गेलेला असल्यामुळे कथा,पात्र बऱ्याच प्रमाणात प्रेक्षकांशी कनेक्ट होतांना दिसत असली तरी पटकथेच्या काही भागात कुठेही लॉजिक दिसत नसल्याचेही चर्चा आहे.कुठल्याही सिनेमाच्या नकारार्थी आणि जमेच्या अशा दोन बाजू असतात त्या प्रेक्षकच मांडत असतात.'शिद्दत' चित्रपटाचा ट्विटर रिव्यूमध्ये प्रेक्षक काय म्हणता आहे ते जाणून घेऊ.

प्रेम,भावना, वेडेपणा, आकर्षण मला शिद्दत आवडला कारण तुम्ही प्रेमात असणे ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे.ही जगी आणि कार्तिकाच्या प्रेम कथेचा शेवट असा व्हायला नको होता.

 बऱ्याच दिवसानंतर अशी लव स्टोरी पाहण्यात आली.जर 'शिद्दत' सिनेमागृहात प्रदर्शित झाला असता तर ब्लॉकबास्टर हिट झाला असता.

'शिद्दत' बऱ्याच चित्रपटांचे मिश्रण आहे.सिनेमाला स्वतःची ओळख नाही

सिनेमाने 'परफेक्ट लव स्टोरी'  बनण्याचा प्रयत्न केला परंतु जमले नाही.

खूप सुंदर कथानक आहे.चित्रपटाचा शेवट पाहतांना किती वेळेस रडलो मलाही माहीत नाही 

 

चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल देशमुख यांनी आतापर्यंत चार सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आणि शिद्दत वितिरिक्त तीन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.शिद्दत सोडला तर बाकी सात सिनेमात त्यांचा अभिनेता,इम्रान हाश्मी होता.पहिल्या वेळेस कुणाल इम्रान शिवाय इतर अभिनेत्यासोबत काम करत आहे. आणि एकंदरीत दिग्दर्शकाच्या विश्वासावर सनी कौशल खरा उतरताना दिसतोय.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.