टी-सीरिज फिल्म फॅक्टरीतुन अजून एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.ज्यात कार्तिक आर्यन Kartik Aaryan आणि 'मिमी' फेम अभिनेत्री क्रीती सेनन Kriti Sanon लीड रोल साकारताना दिसतील.चित्रपटाचे नाव 'शेहजादा' Shehzada असून सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख 4 नोव्हेंबर 2022 देण्यात आली आहे.
'शेहजादा' टीमकडून सोशल मीडियावर या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली असून सिनेमाचे पोस्टर व प्रदर्शनाच्या तारखीबद्दल माहिती देण्यात आली.तसेच सिनेमातील मुख्य कलाकारांची नावेही घोषित केल्या गेली.क्रीती आणि आर्यन व्यतिरिक्त पोश्टरवर कुणीही दिसत नसले तरीही पोस्टमध्ये कलाकारांना टॅग करून इतर कलाकरांबाबत माहिती देण्यात आली.परेश रावल(Paresh Rawal),मनीषा कोईराला(Manisha Koirala),सचिन खेडेकर(Sachin Khedekar) आणि अंकुर राठी (Ankur Rathee) यांचा समावेश चित्रपटात असणार असल्याचे पोस्टहून समजते.
'शेहजादा' अल्लू अर्जुन Allu Arjun आणि अभिनेत्री पूजा हेगडे Pooja Hegde यांच्या'आला वैकुंठपुरमूलू'(Ala Vaikunthapurramuloo) या 2020 मधील सुपरहिट तेलगू सिनेमाचा रिमेक असून सिनेमाचे दिग्दर्शन रोहित धवन (Rohit Dhawan) करणार आहे.
क्रीती हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटहून सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केल्यावर 'शेहजादा' मधील तिचा कॉ स्टार कार्तिकने त्यावर एक कॉमेंट केले ज्यात तो लिहितो,"सबसे गरीब प्रिंस की सबसे गरीब प्रिंसेस" या कॉमेंटमूळे चित्रपटाबद्दल सस्पेन्स वाढले असून कार्तिकने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.