जालियनवाला बाग हत्याकांड भारतीय इतिहासातील काळा दिवस असल्याचे आपण शालेय पुस्तकातून वाचले आहे.पण या घटनेचा आणि त्यानंतर झालेल्या प्रतिक्रियेची व्यवस्थित संशोधित माहिती फार थोडया लोकांनी वाचली असेल.याच माहितीला सरदार उधम (Sardar Udham) चित्रपटातून सादर केले आहे तर जास्त काही इन्ट्रो न करता या सिनेमाच्या रिव्युला सुरुवात करू.
1919 मध्ये घडलेल्या 'जालियनवाला' हत्याकांडात शांतपणे निदर्शन नोंदवत असलेल्या जमावावर गोळ्या घालण्याचे आदेश देणारा जनरल डायर (General R.E.H. Dyer) होता पण डायरला हा अधिकार देणारा मायकेल ओ'डायर ( Michael O'Dwyer) त्या काळात पंजाब प्रांताचा गव्हर्नर होता.त्यानेच डायरला काहीही करण्याची छूट दिली होती.आणि त्याच ओ'डायरची हत्या सरदार उधम सिंग 21 वर्षानंतर 1940 मध्ये लंडनला जाऊन करतो.चित्रपट सरदार उधम मध्ये हे सारे घटनाक्रम दाखवण्यात आले आहे.
Sardar Udham movie -Vicky Kaushal in still,image credit Amazon Prime |
उधम सिंग कशा प्रकारे वेगवेगळे पासपोर्ट वापरून लंडणपर्यंत पोहोचतो,ओ'डायरच्या हत्येची योजना आखण्यात व आमलात आणण्यात त्याला 9 वर्ष का लागतात,या नऊ वर्षात तो लंडनमध्ये अंतर्वस्त्रे विकून,कारखान्यात काम करून राहत असतो.तिथे कोण त्याची मदत करतात,अशा गोष्टींची उत्तरे तुम्हाला सरदार उधम सिनेमात पाहायला मिळतात.सिनेमाचा फर्स्ट हाफ खूपच रटाळ आहे.कथानक धीम्या गतीने पुढे सरकते त्यातल्यात्यात इंग्रजी संवादाचा भडिमार दाखवला आहे जो पटकथेसाठी गरजेचा आहे पण कुठेतरी प्रेक्षकांना सिनेमात एंगेज करण्यात अयशस्वी ठरतो.
सरदार उधम सिनेमाचे लेखन करतांना शुभेन्दू भट्टाचार्य आणि रितेश शाह यांना अतिशय मेहनत करावी लागली असेल हे जाणवते.चित्रपटाचे दिग्दर्शन संवेदनशील विषय हाताळण्यासाठी प्रसिद्ध असलेले शुजीत सरकार (shoojit sirkar) यांचे आहे.उधम सिंगची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशल (Vicky Kaushal)यांची आतापर्यंतची अभिनय कौशल्य दाखवणारी सर्वात चांगली भूमिका आहे.उधम सिंग यांच्या प्रियसीच्या भूमिकेत ब्रिटिश-इंडियन अभिनेत्री बनिता संधू (Banita Sandhu) हिची छोटी भूमिका आहे,मात्र बनिताचा अभिनय लक्षणीय ठरते.142 मिनिटांच्या सरदार उधम चित्रपटात इतिहासाची नवीन बाजू पाहायला मिळते.ऍमेझॉन प्राइम वर सरदार उधम सिनेमा प्रदर्शित झाला असून समीक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया चित्रपटाला मिळत आहे.टेक्निकली चित्रपट खूपच व्यवस्थित तयार करण्यात आला आहे.80 ते 100 वर्ष जुना इतिहास दाखवतांना वेशभूषेपासून तर मेकअप,कॉस्च्युम्स पर्यंत फार काळजीपूर्वक काम केल्या गेले असल्याचे दिसते.तो काळ रिक्रियेट करतांना कला दिग्दर्शकांकडून विशेष मेहनत घेतल्या गेली आहे.या कारणांनी सिनेमा प्रभावी ठरतो.सरदार उधम सिनेमाला bollyvarta कडून 5 पैकी 3 रेटिंग दिल्या जात आहे.