ठराविक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेऊन ओ.टी.टी.प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलेला 'सनक' एक हॉलिवूड स्टाइल ऍक्शन सिनेमा आहे.ऍक्शन हिरो विद्युत जमवालसाठीच(Vidyut Jammwal)'सनक' सिनेमाची कथा लिहिण्यात आल्याचे सिनेमा पाहतांना जाणवते.कारण सिनेमाच्या एकूण वेळेच्या 95 टक्के फक्त ऍक्शन फाइट्स बघायला मिळते.ज्या प्रेक्षकांना मारधाडने भरपूर असे हॉलिवूड ऍक्शन सिनेमा आवडतात त्यांच्यासाठी 'सनक' एक चांगला चित्रपट ठरू शकतो.
'सनक' वन लायनर मूवी आहे.ज्यात चित्रपटातील हिरो त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी व्हीलनशी लढतो,असे आपल्याला म्हणता येईल.कथेत विद्युतच्या बायकोचा रोल केला आहे रुक्मिणी मैत्रा(Rukhmini Maitra) जी एका वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात भरती होते आणि शस्त्रक्रिया यशस्वी होऊन लवकरच घरी जाणार असते.पण त्या इस्पितळातच काही आतंकवादी घुसतात जे रुग्णांसोबत संपूर्ण इस्पितळ स्टाफला ओलीस ठेवतात.आणि मग सुरु होतो पत्नीला वाचवण्यासाथीचा खेळ.
डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होत असलेल्या सनकमध्ये चंदन रॉय सन्याल (Chandan Roy Sanyal) निगेटिव्ह रोल साकारत असून दहशतवाद्यांचा म्होरक्या दाखवला आहे.चंदनच्या 'बोपा भाई'या 'आश्रम' वेबसिरीजमधील भूमिकेपेक्षा ही भूमिका थोडी वेगळ्या थाटणीची आहे.
सामान्य बॉलीवूड चित्रपटांपेक्षा हटके ऍक्शन सनकमध्ये पाहायला मिळते.सिनेमात मार्शल आर्टसचा बेहतरीन वापर केला गेला आहे.सिनेमा पात्रनिर्मितीमध्ये वेळ न दवडता सरळ मुद्यावर येतो त्यामुळे काय?कसे? या 'लॉजिक'च्या फंद्यात नपडता प्रेक्षकांनीही चित्रपटातील ऍक्शन एन्जॉय करावी.अशी एकंदरीत अपेक्षा 'सनक' निर्मात्यांची असावी.त्यामुळे ऍक्शन सिनेमांच्या चाहत्यांनी 'सनक' मिस न करता पाहावे.बॉलिवार्ता या चित्रपटाला 5 पैकी 2.5 स्टार देत आहे.