Type Here to Get Search Results !

अक्षय कुमारने जाहीर केला नवीन चित्रपट 'गोरखा' Gorkha

Akshay Kumar Announced New Movie 'Gorkha' based on major general ian Cardozo
Akshay Kumar in poster gorkha as a military man
Image released by 'cape of good films' via IG,shared by Akshay Kumar

चित्रपटात अथक काम करणारा अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar)आपल्या सोशल मीडिया अकाउंटहुन एका सत्य घटनेवर आधारित नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.मेजर जनरल इयान कार्डोझो (Ian Cardozo)यांच्या 1971 मधील पाकिस्तान विरुद्धच्या युद्धातील कामगिरीवर आधारित या सिनेमाचे नाव 'गोरखा'(Gorkha) असल्याचे जाहीर करण्यात आले.

1971 च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुरखा रेजिमेंटचे मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावरील 'गोरखा' सिनेमात इयान यांनी युद्धात दाखवलेल्या धैर्याचे चित्रण दाखवण्यात येईल.इयान यांच्या युद्धातील बऱ्याच साहस कथा लोकांना ज्ञात आहे.त्यापैकी एक म्हणजे स्फोटात त्यांच्या पायाला जखम झाली होती आणि युद्धात वैद्यकीय रसदिचे मार्ग बंद झाले होते.त्यावेळेस त्यांनी गँगरीन होऊ नये यासाठी कुकरीने स्वतःचा पाय कापला होता.मेजर इयान हे पहिले अपंग अधिकारी ठरले होते ज्यांनी युद्धात आज्ञा(कमांड) दिल्या आहेत.अशा बहादूर सैनिकाच्या जीवनावर 'गोरखा' अजून प्रकाश टाकू शकेल.

सिनेमातील इतर कलाकार कोण असेल याबाबतची माहिती अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.चित्रपटात अक्षय कुमार मेजर आयन यांची भूमिका करत असून गोरखाचे दिग्दर्शन संजय पुरणसिंग चौहान(Sanjay Puran singh Chauhan) करणार आहे.संजय यांनी नीरज यादव यांच्यासोबत मिळून सिनेमाचे कथा-पटकथा-संवाद लिहले आहे.केप ऑफ गुड फिल्म निर्मित गोरखा चित्रपटाचे आनंद एल.राय आणि हिमांशू शर्मा हे निर्माते आहे.चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून 2022 मधे सिनेमा प्रदर्शित होईल.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.