Type Here to Get Search Results !

सोनाली बेंद्रेची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हाला करेल 'इम्प्रेस'Sonali Bendre walking on street in white low high top paints


अभिनेत्री सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटहुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यात ती अगदी साध्या 'कॅज्युअल लुक' मध्ये मुंबईतील रस्त्यावर फिरताना दिसतेय.व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने बऱ्याच दिवसानंतर पाई बाहेर निघाल्याचे म्हंटले आहे.

व्हिडीओमध्ये सोनाली तिच्या नावाचे इनिशीयल (SBB sonali bendre behl) कस्टमाइज केलेली क्रिस्टीयन डीओर बुक टोट बॅग फ्लोन्ट करतांना दिसतेय

Sonali Bendre flaunts her designer tote bag for camera photo


कॉटन व्हाइट रंगाच्या क्रोप्ड पॅण्ट आणि हाय-लॉ/असीमेट्रिकल टॉप मध्ये या एम्ब्रॉयडरी बॅग सोबत सोनाली मस्ती करतांना तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल.नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या सोनालीला कुठल्याही हेवी मेकअपची गरज नाही.सिम्पल न्यूड मेकअप मधूनही सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.सोनालीने हातात सिलिकॉन पिंक स्ट्रॅप् फिटनेस स्मार्ट वॉच घातली आहे.ही रिस्ट वॉच या कॅज्युअल वेअर सोबत पूर्णपणे अनुरूप असल्याची पाहायला मिळतेय.

sonali bendre looking to upper side her one hand reached to protect eyes from the sun


सोनालीच्या या लुक वर इंडस्ट्रीतील तिच्या मित्र मैत्रिनींनी ती खूप सुंदर दिसत असल्याच्या कॉम्प्लिमेंट्स दिल्या आहेत.

बॉलीवूडमध्ये तसेच दक्षिणेतील अनेक चित्रपटात 'बबली' हिरॉइनचे काम केलेल्या मराठमोळ्या सोनालीने फिल्म मेकर गोल्डी बहल यांच्याशी 2002 मध्ये लग्न केले.लग्नानंतर परिवारात व्यस्त असलेली सोनाली मोठया पडद्यावर मुख्य भूमिकेत पुन्हा दिसली नाही.मात्र पुन्हा अभिनयाला सुरुवात न करता टेलिव्हिजन वरील काही कार्यक्रमात तीने जज म्हणून भूमिका साकारली तसेच एखाद्या दोन चित्रपटात गेस्ट अपिरियन्समध्ये तिला पाहता आले.दरम्यान, 2018 मध्ये सोनालीला डॉक्टरांनी चवथ्या स्टेजचा कर्करोग सांगितला होता.ज्यात फक्त 30 टक्के वाचण्याची उमेद होती.परंतु सोनालीने हिंमतीने त्यावर मात करून दाखवली आहे.आता मात्र या व्हिडिओमधून तिच्या फॅन्स,मित्र मंडळीला ती स्वस्थ असल्याचाही संदेश मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.