Image credit-Bhagyashree |
आपल्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात अमाप प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन (Bhagyashree Patwardhan) फार कमी वयात स्टार झाली होती.हो!आपण बोलतोय 'मैने प्यार किया' मधील सुशील,आल्हाद,पारंपरिक विचाराची मुलगी 'सुमन'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्री बद्दल.असे काय? झाले की एवढे यश मिळवून सुद्धा भाग्यश्रीला त्यानंतर मोठ्या बॅनरचे सिनेमे मिळाले नाही.'मैने प्यार किया' ह्या एकमेव चित्रपटामुळेच तिला आजही ओळखल्या जाते का?,कुठल्या निर्णयामुळे भायश्री पटवर्धनचे करियर मर्यादित होऊन गेले?चला तर जाणून घेऊ,या प्रश्नांची उत्तरे
वयाच्या अठराव्यावर्षी टेलिव्हिजन धारावाहिकमधून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवणाऱ्या भाग्यश्रीला १९ व्या वर्षी पहिला चित्रपट 'मैने प्यार किया' मिळाला,'राजश्री प्रोडक्शन' सारख्या मोठ्या बॅनरच्या सिनेमातून पदार्पण झालेल्या भाग्यश्रीला या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री डेब्यू फिल्मफेअर पारितोषिक सुद्धा मिळाले होते.या सिनेमातील भायश्री आणि सलमान खान यांच्या जोडीने तरुणाईला वेड लावले तसेच येणाऱ्या काळात या जोडीचे अनेक चित्रपट पाहायला मिळणार असे प्रेक्षकांना वाटायचे.मात्र भाग्यश्रीने बॉलीवूडमधील ग्लॅम फेमला डावावर लावून लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एका वर्षाच्या आत १९९० मध्ये भाग्यश्रीने तिचा कॉलेजमित्र हिमालय दासानी सोबत(Himalaya Dasani) लग्न केले.लग्नानंतरही भाग्यश्रीला चित्रपट मिळत होते पण तिने निर्मात्यांपूढे एक अट ठेवली की यापुढे ती फक्त पती हिमालयसोबतच काम करेल.त्यामुळे मोठ्या प्रोडक्शन हाऊसने रिस्क घेतली नाही.पुढे १९९२ मध्ये भाग्यश्रीने हिमालय सोबत तीन सिनेमा केले मात्र एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही.१९९३ मधील 'घर आया मेरा परदेशी' हा त्या दशकातील भाग्यश्रीचा शेवटचा सिनेमा ठरला.हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला होता.या चित्रपटानंतर तिने तिच्या कामाला विराम दिला आणि परिवाराला वेळ देण्याचे ठरवले.
भाग्यश्रीची सिनेमातील दुसरी इनिंग २००३ साली पुन्हा सुरू झाली,चरित्र भूमिकेतुन ती प्रेक्षकांच्या भेटीस आली मात्र भाग्यश्रीच्या 'त्या' निर्णयामुळे तिचे करियर मर्यादित झाले होते.असे आजही तिच्या चाहत्यांना वाटते.पण आता पुन्हा सुरू झालेल्या तिच्या सिने कारकिर्दीत सुद्धा प्रेक्षकांनी तिला तेवढेच पसंत केले आहे.परंतु आजही भाग्यश्रीला 'मैने प्यार किया' वितिरिक्त नवीन ओळख निर्माण करता आलेली नाही.आजही तिला 'सुमन'च्या भूमिकेसाठीच ओळखले जाते.आपल्या सिने कारकिर्दीत यश अपयश बघितलेली भाग्यश्री मात्र खचून गेली नाही.आगामी काळातही ती अनेक भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील.त्यापैकीच 14 जानेवारी २०२२ मध्ये रिलीज होत असलेल्या हिंदी चित्रपट राधे श्याम Radhe Shyam मध्ये ती एक चांगली भूमिका साकारत आहे.