Type Here to Get Search Results !

नवीन चित्रपट 'रश्मी रॉकेट' ट्रेलर झाले रिलीज-पाहू शकता तापसी पन्नूचे हार्ड वर्क

Rashmi Rocket news in marathi चित्रपट येतोय 15 ऑक्टोबरला
Rashmi Rocket Movie Poster Taapsee Pannu As a athletic

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या बोल्ड प्रतिमा आणि बहुआयामी अभिनयाने बॉलीवूड व दक्षिण भारतातील सिने इंडस्ट्रीत ओळखली जाते.तापसी तिच्या चित्रपटांसाठी पुष्कळ मेहनत घेत असते हे सर्वश्रुत आहे.नवीन चित्रपट 'रश्मी रॉकेट'साठीही तिने बरीच मेहनत घेतल्याच नुकतेच रिलीज झालेल्या 'रश्मी रॉकेट ट्रेलर' मधून दिसून येत आहे.तापसी पन्नूचे बहुतेक चित्रपट हे स्त्रियांची मध्यवर्ती भूमिका असलेले आहे या सिनेमातही ती खेळातील लैंगिक असमानतेवरील नियमांवर बोट ठेवतांना दिसेल.

मागील काही वर्षांपासून भारतीय चित्रपटांमध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर बऱ्याच बायोपीक बनल्या गेल्या आणि त्या यशस्वीसुद्धा झाल्या मात्र 'रश्मी रॉकेट' बायोपिक नाही आणि कुठल्या सत्यघटनेवर पण आधारित नाही.ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक नंदा पेरियासामी यांनी लिहिली आहे.त्यामुळे पटकथेला वाव मिळाला असून त्यावर कुठल्याही मर्यादा नसणार आहे.सिनेमाचे दिग्दर्शक आकर्ष खुराणा असून आकर्ष हे सिने,टेलिव्हिजन,ओ टी टी विश्वात अभिनेता-पटकथा लेखन-दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे.'मिसमॅच' या वेबसिरीज आणि 'हायजॅक' चित्रपटाने दिग्दर्शक म्हणून त्यांची उत्तम कामगिरी प्रेक्षकांनी बघितली आहे.

चित्रपटात तापसी एका धावपटूची भूमिका साकारत आहे.कच्छ,गुजरात पार्श्वभूमी असलेल्या खेड्यातील एका मुलीची ही कथा असून जीच्याकडे निसर्गतःच धावण्याच्या गुण असतो.चित्रपटात ती कशा प्रकारे स्पर्धेत सहभागी होती,तिला कोच कशी मदत करतात,खेळात होत असलेल्या लैंगिक चाचण्या विरुद्ध ती कशी उभी राहते हे सर्व पाहायला मिळेल.निश्चितच तापसीने या भूमिकेसाठी तिच्या शरीराला एका धावपटू सारखे बनवले आहे.आणि तिला सिनेमासाठी पळण्याचा किती सराव करावा लागला असेल हे दिसते आहे.आता प्रत्यक्षात १५ ऑक्टोबरला 'रश्मी रॉकेट' सिनेमा झी 5 (Zee5)वर प्रदर्शित होईल तेव्हा तापसी आणि रश्मी रॉकेटच्या संपूर्ण टीमची मेहनत समोर येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.