Type Here to Get Search Results !

करीना कपूर सिनेप्रवास-'हा' सिनेमा ठरला करीनासाठी टर्निंग पॉईंट

करीना कपूर सिने प्रवास (kareena kapoor cine journey in marathi) 

बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री,फॅशन आयकॉन करीना कपूर खान आजही तेवढीच ग्लॅमरस आणि गॉसिप क्वीन आहे जेवढी सिनेसृष्टीत पदार्पण करतांना होती.२१ सप्टेंबर १९८० रोजी जन्मलेली करीना आज वयाचे ४१ वर्ष पूर्ण करते आहे.मात्र तिच्या लोकप्रियतेवर कुठलाही परिणाम झाल्याचा दिसत नाही.आजही ती प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करते.परंतु तिने मिळवलेले बॉलीवूडमधील यश नेपोटिझममूळे शक्य झाले? की तिने मेहनतीने कमावले आहे? हे प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो,तर चला पाहू नेमकी करिना कपूरची यशस्वी होण्यापर्यँची घोडदौड कशी होती.कुठला सिनेमा ठरला होता तिच्यासाठी यशाची पहिली पायरी


Kareena Kapoor 3 in 1 photo teen kareena,young kareena,matured kareena

सिने इंडस्ट्रीतील सर्वात मोठा आणि जुना परिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कपूर' घराण्यातील सदस्य असलेली करीनासाठी चित्रपट बनवण्यास कुणीही निर्माता तयार झाला असता.किंवा त्यांच्या स्वतःची चित्रपट निर्माण कम्पनी 'आर.के.स्टुडिओ' ने करीनाला लाँच केले असते.मात्र करीनाने चित्रपट दिग्दर्शक-निर्माता जे.पी.दत्ता यांच्या रिफ्युजी(Refugee)चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले.तिच्या सोबत अजून एका बॉलीवूडमधील दिगग्ज कलाकाराचा मुलगा या चित्रपटातून पडद्यावर झळकणार होता.तो म्हणजे अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन,या दोघांची बॉलीवूडमध्ये ओळख करून देण्याची जबाबदारी जे.पी.दत्ता यांच्यावर होती.दत्ता त्यावेळेस एक 'भव्य चित्रपट' बनवणारे निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे.त्यांचे अगोदरचे सिनेमे सुपरहिट ठरले होते.दत्ता यांच्या चित्रपटासाठी अनेक कलाकारांना त्यांनी मानाचा समजले जाणारे अवॉर्डस मिळवून दिले होते.मात्र २००० साली प्रदर्शित झालेला 'रिफ्युजी' बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटला होता.त्यामुळे करीनाला 'रिफ्युजी' पासून कुठलाही फायदा झाला नाही.उलट दत्ता यांच्यासह सिनेमातील कलाकारांना देखील टीकेचा सामना करावा लागला.

२००१ मध्ये करीनाचे 'मुझे कुछ केहना है','यादें','अशोका','अजनबी' आणि 'कभी खुशी कभी गम' हे पाच चित्रपट प्रदर्शित झाले.पण 'मुझे कुछ..' सोडला तर बाकी सर्व चित्रपट मल्टिस्टारर होते.ज्यात करीनावर कुठलाही फोकस नव्हता.फक्त एक 'ग्लॅमगर्ल'म्हणून ती चित्रपटात झळकली होती.'मुझे कुछ केहना है' हिट ठरला पण त्याचे सर्व श्रेय चित्रपटातील गाण्यांना मिळाले.२००२ व २००३ या दोन वर्षात करीनाचे एकूण ७ सिनेमे रिलीज झाले परंतु त्यातला कुठलाही सिनेमा सिनेमागृहाच्या तिकीटघरावर जादू करू शकला नाही.यातले बहुसंख्य सिनेमे फ्लॉप ठरले होते.तेव्हा करीनाने काही वेगळे करायचे ठरवून २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चमेली' व 'देव' सारख्या चित्रपटातून तिच्या अभिनयाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला,या सिनेमांचा बराच फायदा तिला बॉलीवूडमधील तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झाला.'चमेली' मधील देहविक्री करणारी महिलेची आणि 'देव'मधील दंगलग्रस्त मुलीची,या भूमिकांमुळे करीनाने सिने समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.या सिनेमांने तिची असलेली चित्रपटातील 'ग्लॅमगर्ल' आणि सिनेमात असलेली शोभेची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री,अशी प्रतिमा  पुसून टाकली होती.

पुढे २००५ आणि २००६ मध्ये प्रदर्शित झालेले 'बेवफा','चुप चुप के','ओमकारा' हे सिनेमे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले परंतु अजूनही करीनाच्या मागे 'कपूर' हे ब्रँडनेम लागलेले होते.अभिनयाच्या जोरावर ती स्वतंत्र ओळख निर्माण करू शकलेली नव्हती.अशातच २००७ मध्ये एक चित्रपट आला ज्याने खऱ्या अर्थाने करीनाला 'अभिनेत्री' म्हणून सिद्ध केले.ज्यात तिच्या अभिनय क्षमतेचे पैलू उलगडले आणि तिच्यावर टीका करणाऱ्याचीं तोंडे बंद करण्यात तिला यश आले.तो चित्रपट होता 'जब वुई मेट'(Jab We Met) इम्तियाज अली दिग्दर्शित या 'रोमॅंटिक कॉमेडी' मध्ये फक्त करीना कपूरचीच चर्चा झाली.

Kareena Kapoor movie Jab We Met Film Stills,kareena in the train scene
Kareena kapoor 'jab we met' film stills

'जब वुई मेट' सिनेमा करीनासाठी टर्निंग पॉईंट ठरला,'उत्कृष्ट अभिनेत्री' साठी असलेले जवळपास सर्वच अवॉर्ड तिला त्या वर्षी मिळाले.याच चित्रपटानंतर ती इंडस्ट्रीत प्रस्थापित झाली.या यशापर्यंत पोहोचण्यास करीनाला ७ ते ८ वर्ष लागले.एक स्टार किड ते एक यशस्वी अभिनेत्रीपर्यंतचा करीनाचा सिनेप्रवास निश्चितच मेहनतीचा आहे.असेच म्हणावे लागेल कारण आपण इतरही काही लोकांचे उदाहरणे देऊ शकतो,जे 'स्टार किड' आहे परंतु सिने क्षेत्रात पुर्णपणे अपयशी ठरले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.