बिगबॉसच्या घरात पहिल्या आठवड्याचा कॅप्टन मिळाला असून उत्कर्ष शिंदेला सीजनचा पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला आहे.बिग बॉस मराठीचे तिसरे सीजन आठवडाभरापूर्वी सुरू झाले असून घरात भरपूर राहडे बघायला मिळता आहे.बिगबॉसचे कार्य नेमकी कशासाठी असते हे समजण्यात स्पर्धकांचा पुरता गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.
बिगबॉसकडून मिळालेल्या साप्ताहिक कार्यात सर्वोत्तम कामगिरी करून उत्कर्ष याने कॅप्टनसी पदाची उमेदवारी मिळविली होती परंतु उत्कर्ष फक्त एकमेव पात्र उमेदवार म्हणून समोर आल्यानंतर बिग बॉसने त्याला महिला सदस्यांपैकी एका सदस्याचे नाव देण्यास सांगितले होते.त्यानंतर उत्कर्षणे त्याला कार्यात मदत करणाऱ्या मीरा जगन्नाथ हिचे नाव पुढे केले,मीरा व उत्कर्ष कॅप्टनसी साठी दोन उमेदवार मिळाल्यावर दोघांमध्ये एक टास्क खेळवल्या गेले ज्यात उत्कर्ष विजयी ठरला.
या दोघात झालेल्या टास्कमध्ये विजयी ठरलेल्या सदस्याला कॅप्टनशिप मिळणार होती तर दुसऱ्याला 'टेम्पटेशन रूम'ची चावी,बिग बॉस मराठीने पहिल्या वेळेस टेम्पटेशन रूमची संकल्पना मांडली आहे. या रूममध्ये पूर्ण सिजनमध्ये फक्त चार स्पर्धकांना जाता येणार आहे व तिथे मिळणाऱ्या अधिकारांचा आणि सुख सुविधांचा वापर करता येणार आहे.त्या रूममध्ये जाणारी मीरा पाहिली स्पर्धक ठरली मात्र तिला मिळालेल्या 'अदला बदली' या अधिकाराचा तिने वापर केला नाही.तिला जो अधिकार मिळाला होता त्यात उत्कर्षच्या ऐवजी तिला कॅप्टन होता येणार होते पण उत्कर्षला त्याबदल्यात एक आठवडा घराबाहेर गार्डन एरियामध्ये झोपावे लागणार असते,त्यामुळे मिराने दिलेल्या अधिकाराचा वापर न करता त्या टेम्पटेशन खोलीच्या बाहेर पडली व उत्कर्षची कॅप्टनशिप कायम राहू शकली.
पहिल्या आठवड्यातच घरात ग्रुप बनण्यास सुरुवात झाली असून कॅप्टनने वाटून दिलेल्या कामावर काही सदस्य नाराज झाल्याचे दिसत आहे.सदस्य कॅप्टनचा निर्णय पक्षपाती असल्याची चर्चा करतांना दिसले आता शनिवारी महेश मांजरेकर यासर्वांकडे कसे बघता याकडे काही स्पर्धकांचे लक्ष लागलेले आहे.