Type Here to Get Search Results !

श्रेयस तळपदे शॉर्ट फिल्म मध्ये,'इथे'बघू शकाल 'Speed Dial'

Short Film Speed Dial poster Actor Shreyas Talpade and Aksha Pardasany

ओम शांती ओम फेम 'पप्पू मास्टर' श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)सध्या छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.झी मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ'या मालिकेतून त्याने प्रार्थना बेहरे(Prarthana Behere)सोबत टेलिव्हिजन विश्वात १७ वर्षानंतर पुन्हा पदार्पण केले.मात्र श्रेयसला आता त्याचे फॅन्स युट्युबवर सुद्धा बघू शकतात.श्रेयस'स्पीड डायल'(Speed Dial)नावाच्या शॉर्टफिल्म मध्ये झळकला आहे.'वोडका डायरीस' सिनेमाचे दिग्दर्शक,निर्माते कुशल श्रीवास्तव व प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची कन्या अंतरा श्रीवास्तव यांनी 'स्पीड डायल' बनविली आहे.श्रेयस सोबत तुम्हाला अभिनेत्री अक्षा परदासनी (Aksha Pardasany) या शॉर्टफिल्ममध्ये दिसेल.विनोदी स्वरूपाची 'स्पीड डायल' एक जुना मोबाईल फोन ज्याने कॉल केल्यानंतर समोरचा कुठल्याही गोष्टीसाठी तयार होतो हे दाखविते.

कित्येक अवॉर्ड जिंकणारी फिल्म 'इकबाल'(Iqbal २००५) नंतर श्रेयसला कुठलीही 'सोलो' पिक्चर मिळाली नाही अशी खंत या अभिनेत्याने व्यक्त केली होती.काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत श्रेयसने बॉलीवूडबद्दल बरेच खुलासे केले होते ज्यात त्याने सांगितले मित्रांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला,माझ्यासोबत कुणीही काम करायला तयार नाही.श्रेयसने बॉलीवूडच्या तुलनेत मराठी सिने इंडस्ट्रीचेही कौतुक केले होते.

'डोर,' 'वेलकम टू सज्जनपूर','इकबाल' मराठीत 'सावरखेड-एक गाव' अशी दर्जेदार व  गंभीर स्वरूपाच्या सिनेमातून लोकांना आवडलेला श्रेयस कॉमेडी सिनेमातूनही प्रेक्षकांना भावला होता.'अपना सपना मनी मनी','गोलमाल रिटर्न','हाऊसफुल-२','ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' या व अशा बऱ्याच मल्टिस्टारकास्ट असलेल्या चित्रपटातूनही त्याने आपल्या अभिनयाची नोंद घेण्यास प्रेक्षकांना भाग पाडले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.