Type Here to Get Search Results !

'Shershaah' movie review कॅप्टन बत्रांना अचूक श्रद्धांजली

'Shershaah' marathi review 
'शेरशाह' कॅप्टन विक्रम बत्रांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली..
दरवर्षी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला देशभक्तीपर चित्रपट येतात ते सर्व टाइमपासच असतात असे नाही,विषयाची गंभीरता किंवा वास्तविकतेचे दर्शन त्यातुन घडते असेही होत नाही.जेव्हा बायोपिक बनवतात तुम्हाला काही मर्यादा असतात,एकतर त्याव्यक्तीचे जीवन जगजाहीर असते दुसरे तुम्हाला मोजकच 'सिनेमा मटेरियल' वापरता येते.पण देशभक्तीपर आणि बायोपिक या दोन्ही कसोट्यावर 'शेरशाह' सिनेमा खरा उतरला.
Shershaah movie poster a battle scene and text
Image source-dharma production instagram

एका सैनिकाचे व्यक्तिगत आयुष्य आणि युद्धातील शौर्य सुंदर प्रकारे चित्रित करण्यात आले आहे.देशभक्तीपर चित्रपट म्हंटले की एखाद भावनिक गाणे टाकणे हा पायंडा 'शेरशाह' ने मोडून काढला.कथानक एवढे ताकतीचे आहे की अशा गाण्याचे ते मौताज होत नाही.

सिनेमाच्या फर्स्ट हाल्फ मध्ये कॅप्टन बत्रा यांनी कारगिल युद्धाच्या अगोदर काश्मीरमध्ये केलेले आतंकवादविरोधी कारवाया दाखवल्या आहे.इंटरवलनंतर कारगील युद्ध दाखविण्यात आले आहे.सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) व किअरा अडवाणी(Kiara Advani) सोडले तर काहीच चेहरे ओळखीचे आहे त्या सह्ययक पात्रांचेही अभिनय सरस वाटतात.सिध्दार्थ मल्होत्राच हा रोल करेल असे कॅप्टन बत्रांच्या घरच्यांची मागणी होती कारण त्यांना सिद्धार्थमध्ये त्यांच्या मुलाची झलक दिसते असे त्यांचे म्हणणे होते.सिद्धार्थ मल्होत्राने अभिनयाने त्यांची मागणी रास्त ठरवली.आतापर्यंतचा त्याचा हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे.किअरा अडवाणी साकारत असलेल्या पंजाबी मुलीच्या भूमिकेत तिची भाषा थोडी खटकते पण 'चलता हैं उंनिस बिस'बऱ्याच लोकांना असे वाटतेय सिनेमाचे नाव 'शेरशाह' का? तर कारगिल युद्धामध्ये कॅप्टन विक्रम बत्रांच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी चा कोड 'शेरशाह' होते.सिनेमा युद्धावर आधारित आहे म्हणजे भरपूर मारधाड आणि दुष्मन देशाला शिवीगाळ आलीच आणि गाण्यात एकदोन किसिंग सीन्स दाखवण्यात आले आहे.फॅमिली सोबत 'शेरशाह' बघत असाल तर गाणे स्कीप करा.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची 'गुंजन सक्सेना' या बायोपिकवर देशभरातून टीका झाली होती.तशी कुठलीही चुकी या चित्रपटात केलेली नाही.सुपरहिट तामिळ चित्रपटांचे दिग्दर्शक विष्णुवर्धन यांनी 'शेरशाह'ला पूर्ण न्याय दिला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.