Type Here to Get Search Results !

'Kuttey'मधून करणार विशाल भारद्वाजचा मुलगा दिग्दर्शनात पदार्पण

 

Kuttey movie first look poster

आपल्या वेगळ्या थाटणीच्या सिनेमासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक,संगीतकार,निर्माते,कथा-संवाद लेखक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj)यांचे सिने इंडस्ट्रीत एक मोठे नाव आहे.आता त्यांचा मुलगा आसमान(Aasmaan Bharadwaj) सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.आसमान चा पहिला चित्रपट 'कुत्ते'(KUTTEY)चे फर्स्ट लुक शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. 'Kuttey' चित्रपटात मोठी स्टारकास्ट आणि बरेच दिगग्ज कलाकार पाहायला मिळणार आहे.ज्यात अर्जुन कपूर(Arjun Kapoor),तब्बू(Tabbu),नसरुद्दीन शहा(Naseeruddin Shah),कोंकणा सेन शर्मा(Konkana Sen Sharma),आणि राधिका मदन(Radhika Madan) यांचा समावेश आहे.सिनेमाची कथा-पटकथा विशाल व आसमान भारद्वाज यांची असून सिनेमा संगीतबद्ध करण्याचे काम विशाल भारद्वाज करतील.गीत लिहिण्याची जबाबदारी गुलजार यांच्याकडे असून गुलजार हे विशाल भारद्वाज यांचे आवडते गीतकार आहे.विशाल यांच्या सर्व चित्रपटांची गाणी गुलजार यांच्याकडूनच लिहून घेतल्या जाते.गुलजार व विशाल भारद्वाज यांच्या जोडीने बॉलीवूडमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणे दिली आहे.त्यामुळे कुत्ते सिनेमाच्या संगीताकडून सुद्धा प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा असतील.टी-सिरीज बॅनरखाली बनत असलेला ह्या सिनेमाचे निर्माण लव रंजन,विशाल-रेखा भारद्वाज,अंकुर गर्ग हे करत आहे.सिनेमा सध्या 'पूर्व-निर्माण' pre production मध्ये असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल.

आसमान याचा हा दिग्दर्शक म्हणून पाहिला चित्रपट असला तरी या अगोदर त्याने वडील विशाल भारद्वाज यांच्यासोबत '७ खून मांफ','पटाखा','मटरू के बिजली का मंडोला' सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.तसेच आसमान याने चित्रपट निर्माण शाखेत पदवी देखील मिळवलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.