राजेश खन्ना इंडस्ट्रीके इकलौते अभिनेता हैं जिनके साथ मैं सोई हूं-देवयानी चौबल
देवयानी चौबाल १९६० व ७०च्या दशकातील एक अशी सिने पत्रकार,स्तंभलेखक(Columnist) जिच्या लेखणीने त्या काळातल्या मोठ्या-मोठ्या बॉलीवूड सिलेब्रिटीजचे धाबे दनानत,जिच्या तोंडावर सर्व गोड बोलत पण मनात तिच्याबद्दल तिरस्कार असत,तिची लेखणी फक्त जहर उगळते असे म्हंटले जायचे.नखरेल वृत्ती आणि काट्यासारखी टोचणारी भाषाची मालकीण जिला ऍलो जर्नालिझम(yellow journalism)ची देवी संबोधले जायचे.
देवयानीचा जन्म १९४२ मध्ये मुंबईत एका श्रीमंत घरात झाला होता.तिच्या घरात बहुतांश लोक पोलीस अधिकारी किंवा मोठे वकील होते.तिचे वडीलही एक नामवंत बॅरिस्टर होते.दिसायला सुंदर असलेल्या देवयानीला हिरोइन व्हायचे होते पण प्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारीने देवयानीच्या स्कर्ट घालण्यावरून तिच्या पायाबद्दल टिपणी केली होती.तेव्हापासून तिचे फिल्म इंडस्ट्रीबद्दलचे मत बदलले असे बोलले जाते.देवयानीने ज्युनियर सिने पत्रकार म्हणून 'स्क्रीन' मॅगझीनमध्ये नौकरी मिळवली पण तिच्या नखरेल स्वभावामुळे ती तीनच दिवस तिथे टिकू शकली.त्यानंतर देवयानी 'स्टार अँड स्टाईल' मॅगझीनमध्ये रुजू झाली.कनिष्ठ पदावर काम करत असताना तिचे आर्टिकल लोकप्रिय व्हायला लागले.ती पहिली पत्रकार होती जिने सिलेब्रिटीजच्या वैयक्तिक जीवनाबद्दल 'गॉसिप' लिहिण्यास सुरुवात केली.ती या सिलेब्रिटीजचे चमचे,त्या चमच्यांचे पण चमचे यांच्याकडून माहिती काढत त्यामुळे तिची बातमी पक्की व खात्रीलायक असत.लवकरच देवयानीची बढती झाली व तिला स्वतः चा एक स्तंभ मिळाला.इंडस्ट्रीत बसने उठणे चालू झाले. देवयानी दिलीप कुमारची खुप मोठी फॅन होती,त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा तिने प्रयत्नही केला पण दिलीप कुमार देवयानीला भाव देत नसत.तेव्हा दिलीपकुमार यांचे आस्मा नावाच्या एका हैदराबादेतील महिलेशी विवाहबाह्य संबंध चालू होते.यागोष्टीची खबर लागताच देवयानीने पुढील काही लेखात फक्त त्यांच्याबद्दल लिहिले.याला वैतागून दिलीपकुमार यांनी बॉलीवूडमध्ये देवयानी विरुद्ध मोहीमच चालवली."तिला बॉयकॉट करा" असा फर्माणच त्यांनी काढला होता.
हेही वाचा-एक बॉलीवूड स्टार ते इंडियास मोस्ट वॉन्टेड
देवयानी सिने पार्ट्यांमध्ये नेहमीच असायची तिची एक खास पद्धत होती ती एका निश्चित ठिकाणी खुर्ची टाकून हातात दारूचा ग्लास घेऊन बसत मग सिने कलाकारांना आत येतांना स्वतःहोऊन तिच्याशी बोलावे लागत,हातात हात,हॅलो करावे लागत आणि जे असे करत नसत त्यांच्याविरोधात ती तिच्या 'फ्रँकली स्पिकिंग'या स्तंभातून आग ओकत.
![]() |
देवयानी चौबाल डॉन हाजी मस्तान सोबत image credit- Roopesh Kumar |
देवयानी कुणालाही घाबरत नव्हती ना तिला कामावरून काढून टाकण्याची भीती होती.काही कायदेशीर बाबीला सामोरे जावे लागले तर तिच्या परिवारातील लोक होतीच त्यामुळे ज्यांच्या खाजगी आयुष्याला तिने चव्हाट्यावर आणले नाही,देवयानीने सिनेविश्वात असे कुणीच सोडले नव्हते.हेमा मालिनी यांना ती 'बांसी इडली' असा शब्द वापरायची तर अनिल कपूर चा बॉलीवूड प्रवेश झाल्यावर तिने "ये हिरो तो जेब कतरा दिखता है" असे लिहिले होते.देवयानी आणि धर्मेंद्र यांचा पंगा तर खूप गाजला होता.धर्मेंद्र विवाहित असतांना त्यांचे हेमा मालिनीशी असलेले गुपित संबंधाची माहिती देवयानीला लागली आणि तिने त्यांच्याबद्दल लिहायला सुरुवात केली एका कॉलममध्ये तर तिने असे लिहिले "धर्मेंद्र सेटवर अभिनेत्रींना सर्विस देतो आणि रात्री बायकोकडे जातो" त्यानंतर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कार्यक्रम महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित केला होता ज्यात बॉलीवूड कलाकार आले होते.धर्मेंद्रही होते त्यांनी जसे देवयानीला तिथे पाहिले ते देवयानीला मारण्यासाठी तिच्यामाघे पळाले.हे पाहताच देवयानी पळायला लागली खूप दूर पळाल्यावर तिने एका लेडीज बाथरूम मध्ये आश्रय घेतला.एवढे होऊनही देवयानी गप्प बसली नाही ती धर्मेंद्रच्या विरुद्ध लिहितच होती नंतर जेव्हा धर्मेंद्र हेमा मालिनीने गुपचूप लग्न केले याची बातमीही सर्वात आधी देवयानीनेच लिहिली होती.
देवयानीला दोन गोष्टी खूप आवडायच्या एक सफेद रंगाच्या साड्या आणि दुसरे राजेश खन्ना,देवयानी पहिली व्यक्ती आहे जिने राजेश खन्ना समोर 'सुपरस्टार' लावले.त्यानंतर राजेश खन्ना सुपरस्टार म्हणून संबोधले जाऊ लागले.दोघांची खूप जवळीक होती.देवयानीने स्वतः एका इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला आहे की राजेश खन्ना इंडस्ट्रीमधले एकमेव अभिनेता आहे ज्यांच्या सोबत तीने रात्र घालवली आहे.राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया लग्न करणार ही 'ब्रेकिंग' सुदधा सर्वात अगोदर तिनेच दिली होती.तिने राज कपूर यांच्या बद्दलही एक खुलासा केला होता ज्याची खूप चर्चा झाली होती.राज कपूरने पिलेल्या अवस्थेत देवयानीला तिची 'छाती' दाखवायचे सांगितले होते असे एका इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितले होते.
बातम्यांना सणसणीखेज बनवायचे,अफवा उडवायचा,इंग्लिश लेखात हिंदी शब्द वापरायचे याची सुरुवात देवयानीने केली.तिचे बघून इतरही मॅगझीन,वृत्तपत्रांनी तसेच लिहायास सुरुवात केली पण जी लिखाणाची पद्धत देवयानीची होती ती कुणालाही जमली नाही.अशातच १९८५ मध्ये बातमी आली देवयानीला अर्धांगवायू झाला व ती व्हीलचेअरवर आहे.पण तिने लिखाण सोडले नाही.दोन सहाय्यक नेमून ती स्तंभ लिहितच राहिली.तिच्या शेवटच्या काळात देवयानी अंधेरीच्या लोखंडवाला फ्लॅट मध्ये एकटीच राहत होती अखेर १३ जुलै १९९५ रोजी तिची लेखणी कायमची म्यान झाली.देवयानीच्या अंतविधीला इंडस्ट्रीमधून मोजके ८-१० लोक होते.आजही 'ऍलो पत्रकारिता'म्हंटले की देवयानी चौबल यांचेच नाव सर्वात आधी घेतले जाते.'डर्टी पिक्चर' या सिनेमातील अंजु महेंद्रो यांची भूमिका देवयानी चौबल यांनाच प्रेरित आहे.
लेख कसा वाटला याबद्दल Comments मध्ये नक्की कळवा.तुमची प्रतिक्रिया 'Bollyवार्ता' साईटला नवीन काही लिहिण्यास प्रोत्साहन देईल.